शेळवे (ता.पंढरपूर) भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यात पाचवी तर पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले होते या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक आवेश करकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक श्री. देवानंद भिकू चव्हाण यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभिमान शाळेत राबविले आहे. या जि.प.प्राथमिक शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून जिल्ह्यात पाचवा क्रमांक तर तालूक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे साहेब शिक्षणविस्ताराधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे साहेब केंद्रप्रमुख खाडे सर आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…