गुन्हे विश्व

भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यावर जीवघेणा हल्ला!

मुंगेर, 27 जानेवारी: शेतकरी आंदोलनामुळे कालपासून देश पेटलेला असताना, अशातच भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना मुंगेरच्या इव्हनिंग कॉलेजजवळ घडली आहे. मारेकऱ्यांनी भाजपचा अल्पसंख्याकाचा चेहरा आणि प्रदेश प्रवक्ता असणाऱ्या अजफर शमशी  यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात अजफर शमशी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अजफर शमशी हे बिहार भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. त्याचबरोबर ते एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. यावेळी ते आपल्या कारमधून उतरून कॉलेजला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आहेत. यातील एक गोळी अजफर यांच्या मांडीला लागली असून या हल्ल्यात अजफर गंभीर जखमी झाले आहेत

अजफर शमशी यांना आता पाटणा येथील रुग्णालयात हलवलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी जमालपूर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य ललन प्रसाद सिंह यांना अटक केली आहे. असं म्हटलं जात आहे की, दोनच दिवसांपूर्वी ललन प्रसाद यांनी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून पदभार स्विकारल्यानतर अजफर शमशी यांच्याशी वाद झाला होता. या वादातूनच शमशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांना आहे. असं असलं तरी पोलीस सध्या या प्रकरणाचा विविध अंगानी तपास करत आहेत. याप्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच आसपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने आरोपींना शोधण्यात प्रयत्न पोलीस करत आहेत.या दुर्दैवी घटनेनंतर बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयसवाल या घटनेचा तीव्र निषेध केला असून घटना अत्यंत खेदजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याप्रकरणी मी डीजीपींशी बोललो असून पुढील कारवाई केली जात आहे. तसेच अफसर शमशी सुरक्षित आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago