ताज्याघडामोडी

पंढरपूर नागरपालिके मार्फत डासअळी, जंतू नाशक फवारणी

पंढरपूर नागरपालिके मार्फत डासअळी, जंतू नाशक फवारणी
पंढरपूर ः येथे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच सभापती व आरोग्याधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नागरी हिवताप योजना नगरपरिषद पंढरपूर कार्यलायमार्फत शहरात किटकजन्य रोग प्रतिबंध व नियत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डासअळी नाशक फवासणी, जंतू नाशक फवारणी, पाठीवरील पंपद्वारे करण्यात येते. कंटेनर सर्वेक्षण धूर फवारणी, डासोत्पतीस्थानांमध्ये गच्ची मासे सोडणे, कोरोना प्रतिबंधासाठी फवारणी व आरोग्य शिक्षण आदी कार्यवाही केली जाते.
तसेच माहे मार्च महिन्यापासून शहरात दैनंदिन स्तरावर कोरोना प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणे, बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, एस.टी.बसस्थानक तसेच विठ्ठल मंदिर व परिसरात भाविकांची गर्दी असल्याने व इतर सार्वजनिक ठिकाणी, जंतुनाशक फवारणी व किटकजन्य आजार व कोविड १९ च्या प्रतिबंदधासाठी मायाकिंगद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पंढरपूर शहरात तसेच उपनगरात डास निर्मुलनासाठी धूर फवारण करण्यात आली. त्या अनुषंगाने महा जानेवारीमध्ये आज अखेर एकूण ३९,५०,००० स्वे.मी.क्षेत्रफळावर डासअळी नाशक ४,७६,५०० स्वे.मी.भागावर जंतूनाशक फवारणी ३० हातपंपद्वारे करण्यात आली. कंटेनर सर्वेक्षणामध्ये एकूण १५ हजार ६२३ घरांची तपासणी केली असता ९१२ घरे दुषित आढळून आली. तसेच २९,५२९ कंटेनर (पाण्याची भांडी)तपासून असता ९१६ कंटेनर मध्ये डास तसेच माहे जानेवारी २०२१ मध्ये एकूण ६३ डासोत्पत्ती ठिकाणी गप्ती मासे सोडण्यात आली. असून पंढरपूर शहरात एकण ११५ ठिकाणी गप्पी मासेक पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात आली. तसेच किटकजन्य आजार व कोविड १९ प्रतिबंधसाठी  १० हजार हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या.
किटकजन्य आजारासाठी पोषक वातावरणात असल्याने शहरात आलेल्या भाविकांना आवाहन करण्यात येते की, सर्व नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा व आपल्या घर व मठ परिसरात सर्वेक्षणासाठी आपेल्या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच घरामधील फि, कुलर, फुलदाण्या कुंड्या इ.मध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच घराभोवतालचे भंगार सामान निरुपयोगी टायर नारळच्या फुटक्या करवंट्या चहाचे कप इत्यादी समानाची त्वरित विल्हेवाट लावावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यता येत आहे.
नागरिकांनी किटकजन्य आजार व साथरोग होवू नये म्हणून शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व आरोग्य समिती सभापते, मुख्याधिकारी, आरोग्याधिकारी, जीवशास्त्रज्ञ यांनी जनतेस केले आहे. तसेच कोवीड १९ च्या प्रतिंधासाठी सॅनिटायझर मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा वाप करावा. हात साबनाने वारंवार धुवावेत तसेच गर्दी जाणेचे टाळावे असे आवाहन आरग्य विभाग व नागरी हिवताप योजना पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडून करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत. त्या सर्व नागरिकांनी नागरी हिवताप योजनेच्या कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

22 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

22 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago