कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरच्या वतीने शाळा सुरु करणे व मतदान हक्काबाबत जनजागृती फेरीचे आयोजन”
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूरच्या वतीने सोमवार दि.25.01.2021 रोजी सकाळी 9.00 वाजता महाराष्ट्र शासनाने इ.5वी ते 8वी चे वर्ग बुधवार, दि.27.01.2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भातील माहिती पालकांना होण्यासाठी “जनजागृती फेरी” काढण्यात आली. यामध्ये कोरानाच्या काळामध्ये सर्व विद्याथ्र्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत होते. “बुधवार दि.27 जानेवारी 2021” पासून “महाराष्ट्र शासनाने”े दिलेली ही सुवर्ण संधी की ज्यामुळे विद्यार्थी शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले दप्तर घेऊन पुन्हा शाळेच्या शिक्षण प्रवाहामध्ये येवून शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया सुरु होत आहे.
दि.27.01.2021 पासून जेव्हा शाळा सुरु होत आहे, तेव्हा पुन्हा विद्यार्थी हा विद्यार्थी दशेत प्रवेश करत आहे. जनजागृती म्हणून कोरोनाची लस उपलब्ध झाल्याचेही यावेळी सर्वांना सांगण्यात आले त्याचबरोबर शाळेच्या वतीने कोरोना विषयीची प्रत्येक विद्याथ्र्यांने घ्यावयाची काळजी व नियमावली तसेच प्रत्येक इयत्तेचे वेळापत्रक आणि दिवसभरांमधील दोन भागांमध्ये सामाजिक अंतर राखून आणि वर्गांचे निर्जंतुकीकरण करुन पुर्ण तयारीनिशी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे हे या जनजागृती फेरीमध्ये जाहीर करण्यात आले.
या जनजागृती फेरीमध्ये “दि.25.01.2021” हा “राष्ट्रीय मतदान दिन” आहे त्यामुळे मतदानाचे महत्व फेरीच्या माध्यमातून सर्वांना समजावण्यात आले. “मतदानाचे महत्व सांगताना ज्यांच्या वयाची 18 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. त्याचबरोबर मतदान केल्यामुळे प्रत्येक भारतीयांना लोकशाही आणखी सक्षम होण्यास मदत होते” याविषयीची माहिती शहरातील लिंक रोड, वांगीकर नगर, समर्थ नगर, कर्मयोगी नगर, औदुंबर पाटील नगर या उपनगरातून जनजागृती फेरीच्या वतीने करण्यात आली.
या जनजागृती फेरीचे आयोजन प्रोत्साहीत करणारे होते यावेळी संस्थेचे विश्वस्त मा.रोहनजी परिचारक यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी जनजागृतीचे महत्व सांगण्याचे काम प्रा.मंगेश केकडे यांनी केले व फेरीचे फोटो काढण्याचे काम प्रा.मंगेश भोसले यांनी केले. या रॅलीचे नियोजन कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी केले व यावेळी सर्व शिक्षकवृंद मोठ¬ा संख्येने सहभागी होवून फेरी सुनियोजीतपणे पार पाडली.