गुन्हे विश्व

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य

पनवेल, 24 जानेवारी : खारघर गोळीबारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कोपरा गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. 24 तासांमध्ये हे चारही आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं.

23 जानेवारी रोजी प्रतीक रवींद्र आहेर 24 वर्षे इस्टेट एजंट रा.पेण शहर जि रायगड हा पेण येथून 3 वाजताच्या दरम्यान वाशी येथे त्याच्या दुचाकीने फिरण्यासाठी आलेला होता. त्यानंतर तो रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडने आतमध्ये गेला आणि सिगरेट घेऊन ते पीत होता. त्याचवेळी तिथं तीन अनोळखी इसम त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची चावी मागू लागल्याने ते देण्यास नकार त्याने नकार दिला.
प्रतीकने आपल्याकडील वस्तू देण्यास नकार देताच अनोळखी इसमांपैकी एक जण जबरदस्तीने मोबाईल ओढू लागला. त्याला विरोध केल्याने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर शस्त्रातून एक गोळी फायर करून ते तिघेही पळून गेले. जखमीस पायामध्ये गोळी लागल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या एका इसमाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यास पुढील उपचारसाठी एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे दाखल केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

39 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago