पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. या कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी संजय कोकरे, महेश कदम, सचिवपदी दगडू कांबळे, सहसचिव गणेश महामुनी, खजिनदार रफीक आतार, सहखजिनदार प्रीतम पंडित, प्रसिद्धीप्रमुख राजू मिसाळ, कार्यकारणी सदस्य रविंद्र लव्हेकर, सागर आतकरे, राजू बाबर, समाधान भोई, नवनाथ खिलारे, राजू बाबर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ शहापूरकर माजी अध्यक्ष प्रवीण नागणेे आदी उपस्थित होते.
पंढरपूर पत्रकार संघातील पत्रकारांच्या हिताचे प्रश्न सोडवू तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरकुल योजना मंजूर करून आणण्यासाठी देखील प्रयत्नशील राहू असे मनोगत नूतन अध्यक्ष विकास पवार यांनी व्यक्त केले. नूतन कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल यांनी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू, त्याच बरोबर पत्रकारांच्या शासन स्तरावरील विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मनोगत व्यक्त केले. यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे सदस्य समाधान भोई यांची देगांव ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकााऱ्याचाही सत्कार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या हस्ते करण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणात पंढरपूर पत्रकार संघाची कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड सदर बैठकीमध्ये पार पडली आभारप्रदर्शन माजी अध्यक्ष प्रवीण नागणे यांनी व्यक्त केले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…