मुंबई, 22 जानेवारी : गुन्हेगारांना चाप बसावा याकरता पोलिसांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. मुंबई पोलिसांनी तर एक पाऊस पुढे टाकत गुन्हेगारांना आळा बसावा याकरता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर 15 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा लागणार आहे.
छोट्या मोठ्या भुरट्या चोरांपासून ते अगदी अंडरवर्ल्ड डाॅन या मुंबईने पाहिलेत. त्यामुळे गुन्हेगारांची राजधानी “मुंबई” अशी एक ओळख मुंबईची आहे. ही ओळख पुसली जावी याकरता मुंबई पोलीस सतत प्रयत्नशिल असतात. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे ज्यामुळे गुन्हेगारीला आळा तर बसलेच पण गुन्हेगारांनी ही चाप बसेल. याकरता मुंबई पोलिसांनी सुरू केले आहे “मिशन बाॅंड”.
मुंबईत 94 पोलीस स्टेशन आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांची संख्या काही कमी नाही. कारण मुंबईतील गुन्हेगार सुद्धा सतत काही ना काही नवीन युक्ती वापरुन गुन्हे करत असतात. हे आव्हान मुंबई पोलीस यशस्वीपणे निभावतात यांत काही शंका नाही. पण गुन्हेगारांचा बिमोड करुन मुंबईकरांना सुरक्षित वातावरणात जगता यावे याकरता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसत “मिशन बाॅंड” हाती घेतले आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…