टाकळी रोड जगदंबा नगर येथे घरफोडी

      पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील जगदंबा नगर येथे घरमालक कुटूंबासह परगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा कुलूप उचकटून सोन्याचांदीचे दागिने,चांदीच्या मूर्ती तसेच रोख रक्कम ५० हजार लंपास केली असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत सोमनाथ देठे रा.लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
    या बाबत दाखल फिर्यादीनुसार टाकळी रोड जगदंबा नगर येथील रहिवाशी परशूराम लिंगप्पा पाटील हे आपल्या कुटूंबियांसह बेळगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेले होते.दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ६ ते २१ जानेवारी रोजी सकाळी ८ या दरम्यान सदर चोरीची घटना घडली असल्याचा अंदाज असून परशूराम पाटील यांच्या घराशेजारी राहणारे सुरेश कांबळे यांना परशुराम पाटील यांच्या घराच्या दराचा कडीकोयंडा तुटलेला आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ परशुराम पाटील यांचे जावई फिर्यादी सोमनाथ दशरथ देटे यांना हि घटना सांगीतली.परशूराम पाटील यांचे घरातून 1) 40000/- एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस जु.वा.कि.अं.2) 60000/- दिड तोळा वजणाचे सोन्याचे कानातील झूबे व साखळ्या चार जोड जु.वा.कि.अं.3) 20000/- आर्धा तोळा वजणाचे सोन्याचे कानातील दोन वेल जु.वा.कि.अं.4) 12000/- तीन ग्रँम वजणाचे दोन गणपती जु.वा.कि.अं.5) 12000/-तीन ग्रँम वजणाच्या सोन्याच्या कानातील दोन रिंगा जु.वा.कि.अं.6) 5000/- किंमतीची देवघरातील चांदीच्या गणपतीच्या व लक्ष्मीची मुर्ती,कुंकवाचा करंड तसेच लहान मुलाचे पैजण,करदुडा,मनगटी जु.वा.कि.अं.7) 50000/-रू.रोख रक्कम त्यामध्ये 10 रू,100 रू, 500 रू,2000 रू. दराच्या चलनी नोटा8) 15000/- रू किमतीचा एक सँमसंग कंपणिचा LED टिव्ही असा अंदाजे 2 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago