मुंबई, 21 जानेवारी : पैशांचा पाऊस पाडण्याकरता तांत्रिक मांत्रिक सारख्या अघोरी प्रथा आजही 21 व्या शकतात केल्या जातात. धक्कादायक म्हणजे मुंबई सारख्या जागतिक प्रगत शहरात असा प्रकार घडत आहे. मुंबईतील नागपाडा भागातून याप्रकरणी 2 मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे.
नागपाडा येथे एका 82 वर्षीय महिलेचा तांत्रिक मांत्रिक या अंधश्रद्धेवर खूप विश्वास होता. नातीच्या लग्नातील अडसर आणि मुलीच्या कुटुंबातील कलह यामुळे ही महिला अडचणीत होती. यापासून तिला सुटका पाहिजे होती. मात्र सर्व प्रयत्न करुन देखील यातून सुटका होत नव्हती. त्यामुळे महिलेने तांत्रिक मांत्रिकचा मार्ग निवडला आणि अंधश्रद्धेच्या आहारी जावून पैशांचा पाऊस पाडला, तरंच नातीच्या लग्नातील अडसर आणि मुलीच्या कुटुंबातील कलह दूर होईल असं तांत्रिक मांत्रिकांनी त्यांना सांगितले. मग कायवृद्ध महिलेने होते नव्हते तेवढे सगळे पैसे काढून तब्बल 40 लाख रुपये मांत्रिकाला दिले आणि पुढे सुरू झाला एक विचित्र खेळ.
ठरल्या प्रमाणे वृद्ध महिला 40 लाख रुपये घेवून आली आणि नागपाडा येथे त्या महिलेच्या घरी तांत्रिक मांत्रिकांनी त्यांचा खेळ सुरु केला. या मांत्रिकांची ओळख त्या वृद्ध महिलेच्याच परिचयाच्या एका महिलेने करुन दिली होती. परिचय झाल्यानंतर 2019 मध्ये हा बाबा हनीफ नागपाडा येथील वृद्ध महिलेच्या घरी आला. तुमच्या घरात जंतर मंतर केल्यामुळे हे अडथळे दूर होतील असं सांगून धार्मिक विधी करावे लागतील असे हनीफ याने सांगितले. या धार्मिक विधीनंतर अल्ला तुमच्यावर खुश होईल आणि सर्व कामे मार्गी लागतील, असे हनीफ म्हणाला.
अंधश्रद्धाळू वृद्ध महिलेने त्या बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत धार्मिक विधी करण्यास तयार झाली. धार्मिक विधीसाठी चंदन,अत्तर तसेच बळी देण्यासाठी प्राणी, त्यासाठी कारागीर याकरिता पैसे द्यावे लागतील. मौला खुश होऊन आपल्यावर या सर्व पैशांची पुन्हा बरसात करणार असे सांगून हनीफ याने वृद्ध महिलेच्या घरी वारंवार जाऊन पैसे घेतले. पैसे नसल्याचे कारण पुढे करताच धार्मिक विधी अर्धवट सोडल्यास कोप होईल अशी भीती दाखवली आणि अडचणी अधिक वाढतील असं सांगून त्या वृद्ध महिलेच्या घरी काढलेले फोटो दाखवत त्या बाबाने त्याच्या मोबाइलमध्ये विचित्र फोटो काढून त्या वृद्ध महिलेला दाखविले.
यामुळे त्या वृद्ध महिलेने होते नव्हते तेवढे पैसे आणि दागिने विकून आलेले पैसे असे सुमारे 40 लाख बाबा हनीफला दिले. त्या वृद्ध महिलेला खरं वाटावं यासाठी बाबा हनीफ एका मौलानाला तिच्या घरी घेऊन आला. एका खोलीत अंधुक प्रकाश करून नोटांचा पाऊस पाडला. दोघांनी या नोटा उचलून कपाटात ठेवल्या आणि निघून गेले. पण नंतर बाबा हनीफ पुन्हा पैसे मागू लागला. पैसे संपल्याने वृद्ध महिलेने जावयाकडे पैसे मागितले. जावयाने कारण विचारताच पैशाच्या पावसाबद्दल तिने सांगितले.
जावयाने कपाटात जाऊन पैसे पाहिले त्यावेळी लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांची बंडले सापडली आणि बाबाचा खोटेपणा उघड झाला. हे कळताच वृद्ध महिलेने बाबा हनीफला घरी बोलावून घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारला असता बाबाने वृद्ध महिलेला मारहाण केली. पण वेळीच आजूबाजूचे लोकं आल्याने वृद्ध महिला बचावली आणि तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने पोलीसही घटनास्थळी आले. या प्रकरणात नागपाडा पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…