स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेच्या नूतन ग्रा.प.सदस्यांचा होणार भव्य सत्कार

नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात शिवसेनेने समविचारी आघाडी सोबत हातमिळवणी करीत अनेक गावातून शिवसैनिकांना मैदानात उतरवले होते.या निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले असून अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीच्या प्रक्रियेत शिवसेना निर्णायक भूमिका बजवणार आहे.महाराष्ट्रातील जनतेने  या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असून महाविकास आघाडी राज्यात एक नंबरवर राहिली आहे.पंढरपूर तालुक्यात शिवसेनेने भरघोस यश संपादन करीत आपला वाटा उचलला असून या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारी रोजी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. 

  या सत्कार सोहळ्यास शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत सर, माजी जिल्हाप्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, भैरवनाथ शुगर व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, महिला जिल्हाप्रमुख सौ.शैलाताई गोडसे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील तमाम शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागिरक  उपस्थित राहणार आहेत, तरी सकाळी अकरा वाजता सर्वांनी या सत्कार समारंभास पंढरपुर शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व तमाम शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख  महावीर देशमुख यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

21 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

21 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago