ताज्याघडामोडी

बोगस लग्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जालना : वराकडील मंडळींकडून पैसे उकळून खोटे लग्न करणाऱ्या वधूंच्या एका टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ वधुंसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

गुजरात मधील तरुणांशी लग्न केल्यानंतर सासरी जाताना तिन्हीही वधूंनी रस्त्यावर गाडी थांबवून बाथरूमला जाण्याचं निमित्त करून पोबारा केल्यानं हा प्रकार उघड झालाय.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून वराकडील मंडळींकडून उकळलेले पैसे, मोबाईल आणि एक क्रूझर गाडी जप्त केली आहे.

गुजरात राज्यातील एका पियुष नावाच्या व्यक्तीने जालन्यातील चंदनझिरा पोलिसांकडे लग्न करून वधूंनी फसवणूक केल्याची तक्रार केली होती.या तक्रारीवरून पोलिसांनी लग्न करून फसवणाऱ्या ३ वधूसह, एक महिला आणि एक पुरुष अशा ५ जणांना जेरबंद केलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

57 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago