अनवली ग्रामपंचायतीवर सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीचे वर्चस्व
11 पैकी 9 जागांवर मिळविला दणदणीत विजय
पंढरपूर – पंढरपूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अनवली ग्रामपंचायतीवर परिवर्तन झाले असून यामध्ये सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीने 11 पैकी 9 जागांवर दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सदरची निवडणूक सिध्दनाथ भोसले (चेअरमन), पिंटू भोसले (युवक कॉंग्रेस पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष), सुर्यभान घोडके, भिष्मा शिंदे, महादेव शिंदे, भजनदास डिसले, सुनिल वाघमारे, महादेव सुर्यवंशी, संजय पाटील, विजय कुलकर्णी, चांगदेव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लढविलेल्या पॅनलला अनवली ग्रामस्थांनी साथ दिलेली आहे.
या निवडणूकीत दिगंबर पाटील,संजय माळी, संदिप डिसले, चंद्रकांत भंडारे, सुनिता कोकरे, सुमन शिंदे, शुभांगी पाटील, वैशाली खुणे, अर्चना रणदिवे हे 9 उमेदवार विजयी झाले. यामध्ये वॉर्ड क्र.3 व 4 मधील उमेदवार हे 200 पेक्षा जास्त अशा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले आहेत.
यापुर्वीच्या सत्ताधारी पार्टीने चांगल्या प्रकारे काम न केल्यामुळे गावातील समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्यामुळे अनवलीकरांनी सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडी पॅनलला साथ देवून पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांना घरचा रास्ता दाखविलेला आहे.
या निवडणूक यशस्वी करण्यासाठी रामभाऊ भोसले, लहु भोसले, शिवाजी भोसले, पांडुरंग जगताप, महादेव माळी, हरी शिंदे, सचिन शिंदे, प्रकाश सुर्यवंशी,भाऊसाहेब घोडके, समाधान घोडके, आण्णासोा घोडके, भगवान मेटकरी, विठ्ठल कदम यांच्यासह आदि ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.