पंढरपूर शहर तालुक्याचे राजकारण हे गेल्या चाळीस वर्षांपासून दोन राजकीय गटात विभागले गेले असल्याचे दिसून येते.नेत्यांचा पक्ष तोच आपला पक्ष,नेत्यांच्या पक्षाची विचारधारा हीच आपली विचारधारा,अगदी गावपातळीवरील विषय असो अथवा देशपातळीवरील विषय आपल्या नेत्याने घेतलेली भूमिका हीच आपली भूमिका इतक्या प्रखर निष्ठेने या शहर तालुक्यात या दोन्ही गटाच्या नेत्यांच्या समर्थकांचा वावर असल्याचे दिसून येते.आणि जात,धर्म,नाते,सगेसोयरे हे याही पेक्षा आपली आपल्या नेत्यांवरील राजकीय निष्ठा महत्वाची समजणारे समर्थक दोन्ही राजकीय गटात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.मात्र यात एक दिलासादायक वास्तवही असून जेव्हा आपल्या समाजाच्या हिताचा प्रश्न असेल,समाजात कुणावर अन्याय झाला असेल अथवा समाजाच्या विकासाचा महत्वाचा विषय असेल तर राजकीय निष्ठा बाजूला सारत एकत्र येण्याची भूमिकाही विविध समाजातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते घेताना दिसून येतात.
पंढरपूर नगर पालिकेचे स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून यंदा संख्येने अल्प असणाऱ्या समाजातील व्यक्तीस संधी देण्यात येणार आहे अशी चर्चा यावेळी झाल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद आपल्या समाजाला मिळणार या आशेने अनेक संख्याल्प समाजाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे दिसून आले.आधीच संख्येने अल्प आणि शहरात विखुरलेला समाज म्हणून आपण थेट जनतेतून निवडणूक येऊ शकत नाही,पंढरपूर नगर पालिकेच्या निवडणुकांचा अभ्यास केला असता स्वजातीय मतदारांची संख्या हा निकष महत्वाचा असल्याने आतापर्यंत झालेले विजय आणि पराजय पाहता हा निकष नक्कीच महत्वपूर्ण असल्याचे दिसून येते.आणि यामुळेच आपला नगरसेवकपदाच्या निवडणुकीच्या राजकारणात निभाव लागणार नाही हे ओळखून अनेक संख्याल्प समाजातील निस्वार्थी बुद्धीने व आपल्या समाजासाठी काहीतरी करू या भावनेने काम करणारे नगरसेवक पदापासून दूर राहतात आणि खरेतर अशा समाजसेवकांसाठीच स्वीकृत नगरसेवक पद हि संकल्पना अस्तित्वात आली आहे.मात्र ”स्वीकृत” नगसेवक निवडताना समाज हा घटक जसा महत्वाचा समजला जाऊ लागला तसा तो आपला समर्थक आहे का ? याचीही तपासणी होऊ लागली.
यावेळी पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी संख्येने अल्प असलेल्या समाजातील व्यक्तींना परिचारक संधी देणार आहेत अशी चर्चा सुरु झाली आणि पंढरपूर शहरात विविध संख्याल्प समाजातील समाजसेवक आपल्या समर्थकांना सोबत घेत कधी बँकेत,कधी वाड्यासमोर,कधी कर्नल भोसले चौकात गर्दी करून उभा राहिलेले दिसून येऊ लागले.माझ्या समाजाचा मलाच कसा फुल्ल सपोर्ट आहे हे सांगताना दिसून येऊ लागले.अशातच ”एका नावावर एकमत ” करून या असा आदेश असल्याची चर्चा सुरु झाली आणि अनेक संख्याल्प समाजाच्या बैठकांचे सत्र सुरु झाले.अपेक्षेप्रमाणे बहुतांश समाजात ”एका नावावर एकमत ” हे शक्यच नसल्याने या ”स्वीकृत” नावासाठीच्या या समाज बैठकांमध्ये मतभेद तर झालेच झाले पण मनभेदही होताना दिसून आले.आणि विविध समाजातील राजकारणापासून दूर असलेल्या पण आपल्या समाजाला संधी मिळणार आहे म्हणून तरुणांना पाठबळ देण्याच्या हेतूने आलेल्या जेष्ठाना इच्छुकांची समजूत काढता काढता मोठी दमछाक करावी लागल्याची चर्चा आहे.
आता तीन स्वीकृत नगरसेवक निश्चित झाले असून विविध संख्याल्प समाजातील इच्छुक शांत झाले आहेत.माझ्या एकट्याचे नाव जर आपल्या समाजाकडून गेले असते तर मला निश्चित संधी मिळाली असती असाही दावा करताना आपल्यातील इतर इच्छुकांनी थोडे थांबायला पाहिजे होते अशीही चर्चा करताना दिसून येत आहेत.मात्र ”स्वीकृत”साठी इच्छुकांच्या संख्येमुळे समाजात रूंदावलेली सांधण्याचे काम मात्र आता या संख्याल्प समाजातील जेष्ठ मंडळींना करावे लागणार आहे एवढे निश्चित.
मात्र या साऱ्या घडामोडीत निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहून आपल्या संख्येने अल्प असेलल्या समाजासाठी काहीतरी ठोस कार्य करावे या उद्देशाने समाजकार्य करीत असलेल्या अनेक समाजातील अनेक ”निष्पक्ष” समाजसेवकांचा पुरता भ्रमनिरास झाला असून समाजाच्या बैठकीत आपण इच्छुक असल्याचे सांगून उगीच वाईटपणा घेतला अशीही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येत आहे.तर समाजाला प्रतिनिधीत्व देताना ”तरुण व समाजसेवा” या पेक्षा मागील अनेक वर्षाची ”निष्ठा” हाही निकष विचारात घेतली गेली अशीही चर्चा होताना दिसून आली.
मात्र स्वीकृतीसाठीच्या या साऱ्या ”सामाजिक” घडामोडीनंतर विविध समाजातील मौन पाळून असलेले अनेक भालके समर्थक मात्र नगर पालिकेतील भालके समर्थक आघाडीत ”स्वीकृत बिकृत ” निवडीची असली काही भानगड नाही यावर खाजगीत प्रचंड ”समाधान” व्यक्त करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…