ताज्याघडामोडी

.२१ जानेवारी पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष पदवी आणि एम.टेकच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात

.२१ जानेवारी पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षथेट द्वितीय वर्ष पदवी आणि एम.टेकच्या

दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात

पंढरपूरः प्रथम वर्षथेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक च्या प्रवेशासाठी गुरुवारदि.२१ जानेवारी २०२१ पासून  दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु होत असून यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणार आहे. या कालावधीत विशेषतः पहिल्या कॅप राउंड मधून ज्या विद्यार्थ्यांना हवे ते महाविद्यालय आणि  शाखा मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांना या दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयातील प्लेसमेंटवार्षिक परीक्षेचा निकालप्रत्येक वर्षीचे प्रवेशउच्च शिक्षित प्राध्यापक वर्गसोयी सुविधाइन्फ्रास्ट्रक्चर या बाबी प्रामुख्याने आवर्जून पहाव्यात आणि मगच महाविद्यालय निवडावे. पहिल्या फेरीत नकळत झालेल्या चुका सुधारण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीत महाविद्यालयांची नावे काळजीपूर्वक भरावीत.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

            शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य केंद्रीय प्रवेश प्रक्रिया विभागाने दुसऱ्या कॅप राऊंड च्या तारखेत बदल करून आता अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी (बी.इ./ बी. टेक.)थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्या एम.ई./ एम.टेक.च्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंड-२) गुरुवारदि. २१ जानेवारी २०२१ पासून ते शनिवारदि.२३ जानेवारी २०२१ पर्यंत प्रक्रिया चालणार आहेत. या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून स्वेरी अभियांत्रिकी मध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच स्वेरी अभियांत्रिकीचा इन्स्टिट्यूट चॉईस कोड इ. एन.-६२२० हा आहे. कॅप राउंड १च्या प्रवेश निश्चितीसाठी पूर्वी दि. १६ जानेवारी पर्यंत अवधी दिला होता परंतु त्यात अनेक पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे व प्रमाणपत्रे जमा करण्यासाठी प्रशासकीय अडचणी आल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड १ मध्ये सीट ऍलोट झाली होती परंतु दि.१६ जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष कॉलेजमध्ये येऊन प्रवेश निश्चित केला नव्हता असे विद्यार्थी दि.२० जानेवारी २०२१सायं.५:०० वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे जमा करून प्रवेश निश्चित करू शकतात. तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग (डीएसवाय) प्रवेश प्रक्रियेतून ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड १ मध्ये सीट ऍलोट झाली होती परंतु १६ जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष कॉलेज मध्ये येऊन प्रवेश निश्चित केला नव्हता असे विद्यार्थी देखील दि.२० जानेवारी २०२१ च्या सायं.५:०० वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. स्वेरी महाविद्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना मोहोळ,मंगळवेढासांगोलामाढाकुर्डुवाडीकरकंब व बार्शी या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मोहोळ (डी.टी.काशीद- ९१६८६५५३३५एन.एस. शेख-९७६४७९३१८६)मंगळवेढा (पी. बी. आसबे -७८२१००४६४७आर.डी.सोळगे-९७६६९९०२७४)सांगोला (के.बी.जुंधळे-९३७०३४४९८०एस.डी.कदम-८९९९०३७३५५)करकंब (एन.एस.आदमिले-९३२३५९०१६०प्रा.पी.बी.व्यवहारे- ८८८८१२३१४०),  कुर्डुवाडी (एच.एम. तांबोळी -८३८००९०२६०एस.सी. हलकुडे -९८५०२४२१५५)माढा (ए.के. पारखे-९५०३६३२६२२आर.एस. साठे-७७०९९४१४८२) आणि बार्शी (प्रा.एच.आर.पवार-८२०८४४८५९२ प्रा.एन.पी. कुलकर्णी-९८२३६०१८०९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१)स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८)प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८)प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०)प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

12 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago