मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आशिष बिपीनभाई आहिर या 32 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे. मुळचा गुजरातमधील सुरतचा रहिवासी असलेल्या आशिषनं लंडनच्या प्रतिष्ठित संस्थेमधून शिक्षण घेतले होते. कोरोना व्हायरसच्या काळात त्यानं लंडनमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर स्वत:ची कर्ज फेडण्यासाठी त्यानं बोगस वेबसाईट बनवली आणि लोकांची फसवणूक सुरु केली.
आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार केली होती. फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करत त्यानं आत्तापर्यंत 22 हजार जणांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये 90 टक्के महिलांचा समावेश आहे. दागिने, महिलांचे ड्रेस मटेरियल या प्रकारच्या महिलांच्या उपयोगी साहित्याची आशिष प्रामुख्यानं विक्री करत असे.
एका महिलेनं आशिषच्या वेबसाईटवरुन 2400 पेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर दिली होती. या महिलेला ऑर्डर केलेलं साहित्य मिळालं नाही. तसंच तिचे पैसे देखील परत मिळाले नाहीत. त्यामुळे तिने सायबर पोलिसांकडं तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात बोगस वेबसाईटचं प्रकरण उघडकीस आलं आहे. आशिषवर फसवणूक तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…