”त्या”ऍक्टिव्हा चालकाच्या शोधात पंढरपूर शहर पोलीस

पंढरपूर शहरातील अतिशय वर्दळीचा व सातत्याने अपघात प्रवण म्हणून ओळखला जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज रोडवर अहिल्या धाब्यानजीक शिरढोण तालुका पंढरपूर येथील ग्रामस्थ महादेव शिवाजी भुसनर यांच्या दुचाकीस एका पांढऱ्या रंगाच्या अँक्टिव्हा मोटारसायकल स्वाराने राँग साईडने भरधाव वेगात येऊन धडक दिल्याने या अपघातात सदर महादेव शिवाजी भुसनर  हे गंभीर जखमी झाले होते.या अपघातानंतर सदर ऍक्टिव्हा चालक तेथून पसार झाला होता. महादेव शिवाजी भुसनर याना तात्काळ विठ्ठल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गंगामाई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने ते मयत झाले.
         या प्रकरणी सदर मयत इसम महादेव शिवाजी भुसनर यांचे भाऊ साधु शिवाजी भुसनर वय-35वर्षे, धंदा-मजूरी,रा. शिरढोण ता. पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पांढऱ्या रंगाच्या अँक्टिव्हा मोटारसायकलच्या अज्ञात चालकाविरुध्द दि.23/12/2020रोजी सायंकाळी 7/00वा. ते 7/45वा.चे दरम्यान काँलेज पासून सरगम चौकाकडे येणारे रोडवर अहिल्या हाँटेलच्या पुर्वेस एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या अँक्टिव्हा मोटारसायकल स्वाराने रस्त्याचे परस्थितीकडे दुर्लक्ष करुन राँग साईडने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून माझ्या भावाची मोटारसायकल हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मो.सा. क्र.MH13CC5532च्या डाव्या बाजूच्या बंपरला जोराची देवून महादेव शिवाजी भुसनर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरून घटनास्थळापासून निघून गेला असल्याची फिर्याद दाखल केली आहे.
या अपघात प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोनवले यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण व पोलीस खात्याची प्रतिमा आणखी उजळ करणारी ठरली असून त्यांनी स्वतःहून या अपघाताची माहिती घेत मयताच्या कुटंबास संपूर्ण फिर्याद दाखल करण्याबाबत विचारणा करून सहकार्य केल्याचे दिसून येते. मयत इसम गंभीर जखमी झाल्यानंतर त्यास सोलापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी फिर्यादीवर असल्याने फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला आहे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

19 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

20 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago