ताज्याघडामोडी

वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळणार बॉडीवार्न कॅमेरे

वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त (वाहतूक) सर्वश्री सारंग आवाड, विनिता साहू, लोहित मतानी, गजानन राजमाने, विवेक मासाळ, अक्षय शिंदे, निलोत्पल आदी यावेळी उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या पोलिसांना दोनशे बॉडी वॉर्न कॅमेरांचे वितरण आज करण्यात आले. यावेळी श्री. देशमुख म्हणाले की, बऱ्याचदा वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वेळी पोलिसांनी थांबविल्यास वाद  निर्माण होतो. काही वेळेस हल्लेही होतात. अशा प्रसंगी शहरात पोलिसींग करणाऱ्या पोलिसांना  बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.

या कॅमेरांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे. वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असताना आपल्या गणवेशावर बॉडी वॉर्न कॅमेरा लावतील. रेकॉडिंग सिस्टिम असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता कडक कार्यवाही करण्यात येईल.बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे सुलभ जाईल. पोलीस विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे . बॉडी वॉर्न कॅमेरा म्हणजे वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान सर्व प्रसंगांना रेकॉडिंग करण्यासाठी गणवेशावर लावलेला कॅमेरा असल्याचे अमितेश कुमार यांनी  यावेळी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago