17 जानेवारी : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एमआयडीसी जवळ केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. टँकर महामार्गावरून बाजूला करताना आग लागण्याची शक्यता असून पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
घटनास्थळी सहा क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असण्याची शक्यता असल्याने पलटी झालेल्या टँकरला बाजूला करण्यासाठी खबरदारी म्हणून क्रेन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. टँकर बाजूला करताना आग लागू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
या दुर्घटनेनंतर पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली असून सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू आहे.टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. टँकर लवकरात लवकर महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, हा टँकर नेमका कशामुळे पलटला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…