शनिवारपासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पण राज्यात दोन दिवसांसाठी लसीकरण अभियान स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण लस नोंदणीसाठीचे ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावले आहे.
कोरोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला. पण राज्यात पहिल्याच दिवशी को-विन अॅपमध्ये तांत्रिक दोष झाल्याचे समोर आल्यामुळे राज्यात १७ व १८ जानेवारीला होणारे लसीकरण स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते.
राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरण स्थगित करण्यात आल्याचे वृत्त फेटाळले आहे. १८ जानेवारीपर्यंत राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…