हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलंय, वसमत तालुक्यातील गुंज गावात जिल्हा परिषद शाळेवर मतदान सुरू असताना एका पोलिसाला मारहाण झाली आहे. भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे आणि त्यांचे १५-१६ कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.
पोलिस कर्मचारी गजानन पुरी यांनी त्यांना गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या असता पुरी यांची कॉलर पकडून मारहाण झाली. कार्यकत्यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. विश्वनाथ नरवाडे यांनी तर खाली पडल्यावर दगडाने मारहाण केली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मतदान केंद्रावर वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गजानन पुरी कर्तव्य बजावत होते, मतदान केंद्रापासून १०० मीटर दूर राहण्याचे गर्दी टाळण्याचे आदेश असतांना गुंज येथील ,जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे यांनीयावरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे,दत्ता नरवाडे,विश्वनाथ नरवाडे,काशीनाथ नरवाडे,मन्मथ नरवाडे आणि इतर १२ जणांवर आला आहे.
शासकीय कामात अडथळा करणे,जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे,निवडणूक अधिकाऱ्यांच्या आचारसंहितेचा भंग करणे,उकप्रतिनिधींत्व अधिनियम १९५१ सहकलम ७ क्रिमिनल लाँ अमेडमेण्ट ऍक्ट,सहकलम महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ अश्या विविध १३ कलमान्वये गजानन पुरी यांच्या तक्रारीवरून आज वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…