ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्गी लावा

मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकास मान्यता मिळालेली आहे. या कामासाठी यापूर्वीच्या  शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकालावधीमध्ये निधीची तरतूद झालेली आहे असे समजते. तथापि जागेअभावी अद्यापर्यंत कामास सुरूवात करण्यात आलेली नाही. ते काम अद्यापही प्रलंबित आहे. 

तसेच मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर महाराज यांचे भक्त संपूर्ण देशभरात असून त्यांच्या भक्त समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक झाले तर मंगळवेढा शहराचा विकास होवून या शहर व तालुक्यातील व्यापार, उद्योग वाढून बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार आहे.  तसेच शहराचा नावलौकिक देशपातळीवर होईल. या दृष्टीकोनातून श्री संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद व जागेची त्वरित उपलब्धता करून  त्वरित काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागास सूचना करण्यात याव्यात. अशीही मागणी शैला गोडसे यांनी केली आहे.

संत श्री बसवेश्वर महाराज स्मारकासाठी चे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी केलेली असतानाच संत श्री चोखोबा स्मारकासाठी रुपये पाच कोटीची तरतूद करून त्याचेही काम त्वरित सुरू करणेबाबत नगरविकास मंञी यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे त्यांच्याकडून निश्चितपणे विचार केला जाईल असे वाटते.

शैला गोडसे

जिल्हा प्रमुख शिवसेना

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

45 minutes ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago