न.पा.स्वीकृत नगरसेवकपदासाठी विविध संख्याल्प समाजांच्या बैठकांचे सत्र सुरु !

समाजातील तरुणास संधी मिळावी हा आग्रह मात्र कायम

२०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंढरपूर नगर पालिकेवर परिचारक समर्थक आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करीत सत्तेची सूत्रे पुन्हा हाती घेतली होती.हि निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत झाल्यामुळे पंढरपूर शहराचे जातीय समीकरण पाहता संख्येने अल्प असलेल्या परंतु संपूर्ण शहरात विखुरलेल्या विविध अल्पसंख्य जाती समूहाला प्रभाग पद्धतीत उमेदवारी देताना दोन्ही राजकीय आघाड्याना मोठी कसरत करावी लागली होती.मात्र या साऱ्या राजकीय व्यूव्हरचनेत छोट्या जातिसमूहावर अन्याय होऊ नये यासाठी गेल्या चार वर्षाच्या कालावधीत १० महिने ते १ वर्षे कालावधीसाठीच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी निवड करताना छोट्या जातीघटकातील सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींना संधी देण्याची भूमिका पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी घेतली होती.आणि त्या प्रमाणे अनेकांना संधीही देण्यात आल्याचे दिसून आले.परिचारक यांनी दिलेल्या सूचनेचा तात्काळ आदर राखत गत महिन्यात ३ स्वीकृत नगरसेवकांनी आपला कार्यकाळ संपताच राजीनामे दिले असून आता पंढरपूर शहरात स्वीकृत नगरसेवकपदासाठी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा होताना दिसून येत आहे.अशातच संख्येने अल्प असलेल्या जातिसमूहातील लोकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याच्या चर्चेने शहरात विविध समाजाच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा इच्छुक उमेदवार म्हणून नाव निश्चित करण्याच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. या बैठकांमध्ये समाजाच्या वतीने एकच नाव सुचवा असा आग्रह राजकीय जाणकार धरीत असले तरी अनेक समाजात इच्छुकांची संख्या मोठी असून बैठकीत ”मीच कसा योग्य आणि लायक” उमेदवार आहे हे या सर्वाकडून सांगितले जात असल्यामुळे समाजातील जेष्ठ मंडळींची मात्र गोची झाली आहे.यावर तोडगा म्हणून जेवढे इच्छुक आहेत त्यांची नावे सुचवा कुणाला मेंबर करायचे ते ” मालक ” ठरवतील असाही पवित्रा घेतला जात आहे.

       डिसेंबर २०२१ मध्ये पंढरपूर नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका असून हि निवडणूक छोट्या वार्ड रचनेनुसार होणार असल्याच्या चर्चेने आठ महिण्याऐवजी जरा थांबून आपण पाच वर्षासाठी नगरसेवक होऊ शकतो असा आत्मविश्वास बळावल्यामुळे यावेळी या आठ महिन्याच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या थोडी कमीच आहे.मात्र अल्पसंख्य जातीतील समाजसेवेची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना परिचारकांकडून प्राधान्य दिले जाणार असल्याच्या चर्चेने अशा समाजघटकात मोठा उत्साह दिसून येत आहे.अशातच राजकीय सक्रियता गौण मानत आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे अल्पसंख्य जातीघटकात निरपेक्ष भावनेने समाजकार्य करणाऱ्याला संधी देणार असल्याची चर्चा अशा समाजसेवकांसाठी मोठी संधी असल्याचे मानले जात आहे.   

    अर्थात परिचारक प्रणित आघाडीकडून निवडल्या जाणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या केवळ ३ असून त्यामुळे प्रत्येक अल्पसंख्य समाजघटकाला न्याय देता येणे केवळ अशक्य आहे.स्वीकृत नगरसेवकपदाच्या उमेदवारीवर रविवारी अथवा सोमवारी शिक्का मोर्तब होणार असल्याचे समजते त्यामुळे पुढील दोन दिवस स्वीकृत भावीमेंबर मंडळींसाठी ”फायनल मॅच ” ठरणार आहेत.    

मात्र या साऱ्या घडामोडीत नगरपालिकेतील विरोधक असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीत गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शांतता असल्याने या स्वीकृत नगरसेवक निवडीच्या घडामोडीत संख्याल्प जातीतील भालके समर्थक कार्यकर्ते मात्र ”हातावर घडी आणि तोंडावर बोट” हीच भूमिका बैठकांमध्ये घेताना दिसून येत आहेत.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

21 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

21 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago