ताज्याघडामोडी

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलासा सीईटी सेल कडून दि.२० जानेवारी पर्यंत मुदतवाढ

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलासा

सीईटी सेल कडून दि.२० जानेवारी पर्यंत मुदतवाढ

पंढरपूर– सध्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता अभियांत्रिकीसह अन्य प्रवेश प्रक्रिया सुरु असून केवळ कागदपत्राच्या विलंबामुळे विद्यार्थी व पालक यांची तारांबळ उडत असल्याने विद्यार्थी व पालकांनी कागदपत्रे पूर्ततेसाठी कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्याला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने हिरवा कंदील दाखवला असून आता  ई. डब्ल्यू. एस., नॉन क्रिमिलेअर अथवा जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास दि. २०/०१/२०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

     शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये तंत्रशिक्षणा अंतर्गत येणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणारे उमेदवार व पालक यांच्या लेखी व तोंडी निवेदनानुसार EWS मूळ प्रमाणपत्र, NCL मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्याकरीता दि. २० जानेवारी २०२१ रोजी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. वरील कालावधीत पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी दि. २० जानेवारी २०२१ पर्यंत स्वतःच्या लॉगिन मधून ऑनलाइन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मूळ प्रमाणपत्र दि. २० जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करणार नाहीत अशा उमेदवारांचा  प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करून त्यांना दुसऱ्या फेरी करता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल. ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच पुढील सुधारीत वेळापत्रक दि. १८ जानेवारी २०२१ नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर (www.mahacet.org) प्रसिद्ध करण्यात येईल असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी (९८६०१६०४३१), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८), प्रा. मनोज देशमुख (९९७०२७७१५०), प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago