ताज्याघडामोडी

पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

     पंढरपूर, दि. 16:-  कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड लस निर्माण करण्यात आली असून, लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी सचिन ढोले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपविभागीय  पोलीस अधिकारी  विक्रम कदम,  तहिसलदार विवेक सांळुखे,, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, डॉ.प्रदिप केचे, प्रसन्न भातलवंडे, डॉ.दीपक धोत्रे, डॉ.अनंत पुरी , डॉ.संभाजी भोसले, डॉ.शिवकमल  याच्यासह लसीकरण केंद्रावर नियुक्त केलेले अरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील लसीकरण वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांना परिचारीका मंगल कर्चे, यांनी पहिली कोविड लस दिली. पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी  कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे. लसीकरणासाठी 2 हजार 928 जणांनी कोविन ॲपवर नांव नोंदणी आहे. आरोग्य सेवेशी संबंधित 100 जणांना  आज  लस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर लस सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत देण्यात आहे.  या कामासाठी 5 आरोग्यसेविकांचे पथक नेमण्यात आले आहे. लसीकरणाबाबत त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

लसीकण केंद्रावर लसीकरण कक्ष,  प्रतिक्षा कक्ष, निरिक्षण कक्ष  स्थापन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवून यावे. लाभार्थी  लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची  माहिती घेवून तसेच तापमान, ऑक्सीजन तपासणी करुनच लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण कक्षातून लस दिल्यानंतर संबधिताला अर्धा तास निरिक्षण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कोविन ॲपवरील नोंदणी व्यतिरिक्त इतर कोणात्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार  तसेच  गरोदर माता, स्तनदा माता यांना या लसीकरणातून वगळ्यात  असल्याचे यावेळी  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago