नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा गिरणा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना आज जाहीर झाला आहे.
नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा दरवर्षी १४ जानेवारी रोजी जाहीर केली जाते व ५ एप्रिल ला पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातात.या कार्यक्रमाचे २३ वे वर्ष असून सामाजिक , साहित्यिक , सहकार , वैद्यकीय , प्रशासन , कृषी या क्षेत्रात योगदान देणाऱ्या राज्यातील गुणवंतांना गिरणा प्रतिष्ठानच्यावतीने गौरविण्यात येते.यावर्षी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.येत्या ५ एप्रिल २०२० रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते सदरचा पुरस्कार वितरण केला जाणार असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्कार निवडीची घोषणा गिरणा गौरव समितीचे राजु देसले , किरण सोनार व राजेंद्र निकम यांनी केली आहे.यापूर्वी गिरणा पुरस्कार ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे , पद्मश्री ना.धो.महानोर ,पद्मश्री भवरलाल जैन , पद्मश्री पोपटराव पवार , जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ आदींना उत्तर महाराष्ट्राचा मानाच्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावर्षी प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण अशा योगदानाबद्दल गिरणा पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे मानकरी ठरल्याने जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…