पंढरपूर, दि. 14:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 1 हजार 736 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, निवडणुक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी तालुक्यात 72 ग्रामपंचायतीची पैकी जैनवाडी ग्रामपंचायतीसह 17 मतदान केंद्रांतील 15 प्रभागामधील 100 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. निवडणुकीसाठी 1 हजार 657 उमेदवार निवडणुक लढविणार असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 लाख 4 हजार 416 पुरुष मतदार व 92 हजार 18 स्त्री मतदार तसेच इतर 01 असे एकूण 1 लाख 96 हजार 435 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नियुक्त निवडणूक अधिकारी कर्मचारी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथून गुरुवारी दिनांक 14 रोजी मतदान साहित्य घेवून रवाना झाले आहेत. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी 30 एस.टी.बसेस व 27 जीपची व्यवस्था करण्यात आली होती.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी तालुक्यातील सहा गावे अतिसंवेदनशील असून त्यामध्ये नारायण चिचोंली, कासेगांव, खर्डी, अजनसोंड, गोपाळपूर व त.शेटफळ तसेच गादेगांव, वाखरी, भंडीशेगांव, भाळवणी, धोंडेवाडी, उपरी, पिराची कुरोली, सोनके, तिसंगी, रोपळे, चळे, रांझणी आणि खरसोळी 13 गावे संवेदनशील आहेत. यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत मतदान होत असल्याने मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार सांळुखे यांनी सांगितले.
ग्रामपंचायती निवडणुका ह्या ग्रामपातळीवर संवेदनशील असतात. निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. तसेच मतदारांनी निर्भिड व निपक्षपणे मतदान करावे असे आवाहनही श्री.कदम यांनी यावेळी केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…