स्वेरीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२३ वी तर स्वामी विवेकानंद यांची १५८ वी जयंती साजरी करण्यात आली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीत पालक प्रतिनिधी शेषनारायण पाटील व शिवाजी घाडगे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि सविस्तर माहिती सांगितली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या सर्व महाविद्यालयांना सुट्टी असून हा कार्यक्रम स्वेरीच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी पालक नागनाथ माने, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. भुवनेश्वरी मेलिनामठ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, डॉ.व्ही.एस. क्षीररसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे, प्रा. आशिष जाधव, कु.पूजा रोंगे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.