लवकरच कोरोना लसीकरणाला देशात सुरुवात होणार असून केंद्र सरकारकडून पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला लसीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला पहिली ऑर्डर दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. त्याचबरोबर लसीची अधिकृत किंमत देखील समोर आली आहे. २०० रुपये एवढी लसीच्या एका डोसची किंमत असणार असल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी या लसीसाठी सीरम इंस्टिट्यूटने करार केला असून कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती केली आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.
दरम्यान लसीच्या वाहतुकीसाठीची तयारी देखील सीरम इंस्टिट्यूटकडून पूर्ण झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लसीची कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेट कंपनी वाहतूक करणार आहे. कोल्ड स्टोरेज वाहने देखील सीरम इंस्टिट्यूटबाहेर सज्ज ठेवण्यात आली आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…