मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन देखील काढण्यात आलं आहे.
सुरक्षेत घट केल्यानंतर शरद पवार म्हणाले, ‘माझी सुरक्षा कमी करा. मी स्वतः माझी सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. शिवाय मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.’ असं पवारांनी अनिल देखमुख यांना फोनच्या माध्यमातून सांगितलं आहे.
तीन दिवसांपूर्वी सुरक्षा आढावा समितीची बैठक पार पडली. या समितीने काही जणांची सुरक्षा कमी केली तर काही जणांची वाढवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना Z + सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र त्यांनी राज्य सरकारला सुरक्षा कमी करण्यास सांगितलं आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…