ताज्याघडामोडी

मोठी बातमी : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात

नवी दिल्ली : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांची लसीकरण होईल.16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत आहे. लोहरी, मकर संक्रांती पोंगल यासारखे सण पाहता 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 79 लाख लाभार्थ्यांनी कोविड ऍपच्या  माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं आहे. ज्यांना लसीकरणाच्या सुरूवातीला लस देण्यात येणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर डिजिटल पद्धतीने परीक्षण केले जाईल. यासाठी करनाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 4 लस स्टोअर देखील तयार करण्यात आले आहेत. शिवाय संपूर्ण देशात 37 लस स्टोअर तयार करण्यात आले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago