पंढरपूरः- शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग हे १००% ऍडमिशन पूर्ण झालेले एकमेव खाजगी महाविद्यालय ठरले आहे तसेच डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेशालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरीतील एन. बी.ए. मानांकित अभियांत्रिकी कोर्सेस असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्वेरी इंजिनिअरिंगची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेश सन २०२०-२१ करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली होती.
पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम व थेट व्दितीय वर्ष इंजिनिअरींग (पॉलि.) प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले होते. यावर्षी प्रवेश प्रक्रिया ही केवळ दोनच फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली. डिप्लोमा इंजिनीअरिंगचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. गेली सलग तीन वर्ष १००% ऍडमिशन पुर्ण होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी डिप्लोमा महाविद्यालय आहे. उज्ज्वल यशाची पंरपंरा यंदा देखील महाविद्यालयाने कायम राखत याही वर्षी १००% ऍडमिशन पूर्ण केलेले आहेत.अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्यातील स्वेरी हे एकमेव डिप्लोमा महाविद्यालय आहे. तसेच महाराष्ट्र व गोवा राज्य शासनाकडून बेस्ट पॉलीटेक्निक अवॉर्ड ने ही अगोदरच या कॉलेजला सन्मानित केले आहे.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे सर यांचे विशेष मार्गदर्शन,उज्वल निकालाची परंपरा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे एनबीए मानांकन व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन, उत्कृष्ट प्लेसमेंट, गरीब व होतकरू मुलांसाठी कमवा व शिका योजना, रात्र अभ्यासिकेची सोय, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या सर्वागीण विकास प्रक्रियेत कायम कार्यतत्पर असणारा तज्ञ शिक्षक वर्ग व प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांचे नेतृत्व या सर्व गोष्टींचे फलित म्हणजे प्रवेश प्रक्रियेत स्वेरी कॉलेजला मिळालेला विद्यार्थी व पालक यांचा प्रचंड प्रतिसाद होय.