ताज्याघडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगांवची यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगांवची यात्रा रद्द

 

     पंढरपूर, दि. ७ : राज्यासह इतर राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली कासेगांव ता. पंढरपूर येथील यल्लामा देवीची  ९ ते ११ जानेवारी दरम्यान होणारी यात्रा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत यल्लामा देवीच्या यात्रेतील ‍ धार्मिक विधी, रुढी परंपरेनुसार करण्यात येतील. या  कालावधीत मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असून, कोणत्याही भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, असे आवाहन  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

            कासेगांव ता. पंढरपूर येथील यल्लामा देवी यात्रेच्या अनुषंगाने प्रांत कार्यालयात  देवस्थानचे प्रमुख मानकरी यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. यावेळी  नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे,  पोलीस निरिक्षक किरण अवचर, मंडलाधिकारी बाळासाहेब मोरे, यात्रेचे मानकरी वसंतनाना देशमुख, भाऊसाहेब देशमुख, प्रशांत भैय्या देशमुख, विजय देशमुख उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदीर दर्शनासाठी बंद राहणार असा निर्णय याबैठकीत घेण्यात आला असून या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची व ग्रामस्थांची सुरक्षितता महत्वाची असून  ९ आणि ११  जानेवारी या कालावधीत सतर्क रहावे.  या कालावधीत कोणतेही दुकाने, गाडी, लावू देवू नये याची दक्षता घ्यावी. यात्रा कालावधीत मंदीर परिसरात पोलीस बंदोवस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेसाठी कासेगांव येथे  भाविक येवू नयेत यासाठी सांगोला रोड चौथा मैल, अनवली चौक, जुना कासेगांव रोड, येथे पोलीस विभागाच्या वतीने बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  भाविकांच्या व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. यात्रा कालावधीत भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे  प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  यात्रा कालावधीत  शासनाने  दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे. तसेच या कालावधीत कोणतेही वाहन व भाविक दर्शनासाठी येणार नाही दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

3 hours ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago