पंढरपूर न.पा.समिती सभापतींच्या निवडी जाहीर

पंढरपूर नगर परिषदेच्या विविध समितीच्या मुदत संपल्याने आज नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिपत्याखाली विविध समितीच्या सभापतींची निवड व समिती सदस्यांची निवड करण्यात आली. 

      यावेळी भाजप,पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर व तीर्थक्षेत्र विकास आघाडी व काँग्रेस चे गटनेते सुधीर धोत्रे,सुरेश नेहतराव यांनी समितीच्या सदस्य व सभापती निवडीबाबतचे पत्र पीठासीन अधिकारी यांच्याकडे सादर केले यावेळी बांधकाम समितीच्या सभापती पदी सुरेश वसंत नेहतराव व पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी संजय चंद्रकांत निंबाळकर आरोग्य समितीच्या सभापती पदी विक्रम लक्ष्मण शिरसट शिक्षण समितीच्या सभापती पदी शकुंतला विजय नडगिरे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदी मालन भगवान देवमारे उपसभापती पदी भाग्यश्री देवेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली व   नियोजन व विकास समितीच्या सदस्य पदांची निवड करण्यात आली तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी दगडु नारायण धोत्रे, अक्षय प्रताप गंगेकर व प्रशांत गणपत शिंदे यांची निवड करण्यात आली
       सदरची निवडणूक पार पाडणे कामी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर सभा लिपिक लक्ष्मीकांत कोटगिरी यांनी काम पाहिले
यावेळी नगरसेवक उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, वामनराव बंदपट्टे व सर्व नगरसेवक हजर होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago