ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणूक पंढरपूर तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

ग्रामपंचायत निवडणूक

पंढरपूर तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

   पंढरपूर, दि. 05 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल  ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 71 ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत व जबाबदारीने पार पाडावी अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.  

पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी नवीन शासकीय धान्य गोदाम, अनवली ता.पंढरपूर येथे नियुक्त 1 हजार 736 अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, नायब तहसिलदार पी.के.कोळी, महसूल सहाय्यक श्री. एस.बी.कदम एस.आर.कोळी,यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणूक नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट आदी बाबतची  माहिती प्रात्यक्षिकांसह सांगण्यात आली. तसेच मॉकपोल, घोषणापत्रे इतर निवडणूक संदर्भातील नमुने भरण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच  ग्रामपंचायत निवडणूक कोरोना संसर्गाच्या कालावधीत होत आहेत. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  शासनाने  निर्धारित केलेल्या  नियमांची अंमलबजावणी करावी. मतदासाठी मतदाराला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे  तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पुर्ण करावे,   या कामकाजात निष्काळजीपणा केल्यास त्यांच्याविरुध्द निवडणूक कायद्यातंर्गत योग्य कारवाई करण्यात येईल असेही तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी निर्देश दिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago