पंढरपूर, दि. 03:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे 333 ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू साठा मोहोळ तालुक्यातील मौजे कामती खुर्द गट नं.240/1 येथे 130 ब्रास, मोहोळ पोलीस ठाणे आवारात 70 ब्रास, नरखेड औट पोस्ट येथे 13 ब्रास, मौजे भोयरे येथील सिना नदी काठी 120 ब्रास असा एकूण 333 ब्रास वाळू साठा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 12 लाख एक 32 हजार 100 रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी गुरुवार दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.
सदर लिलावात भाग घेण्यासाठी 25 टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये 2 हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची 25 टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात 7 दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री. ढोले यांनी केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…