ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारणार

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे. काही ठिकाणी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने ऑफलाईन पद्धतीने (पारंपरिक पद्धतीने) नामनिर्देशनपत्र (अर्ज) स्विकारण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून निवडणूक आयोगाने पारंपारिक पद्धतीने अर्ज स्विकारण्याचा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ दि. 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात निर्णय घेतला आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नामनिर्देशनपत्र, घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पारंपरिक पद्धतीने स्विकारलेले नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय हे छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकाच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये भरुन घेणार आहेत.

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑनलाईनसह ऑफलाईन स्वीकारण्याचे आदेश

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) प्रभारी उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी दिले आहेत.
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता ३० डिसेंबर रोजीही अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि. ०१ जानेवारीपर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago