भारतात नव्या कोरोनाचा प्रवेश,ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह

         वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक धक्कादायक बातमी समोर येते आहेत. भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे (New Coronavirus Strain) 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये तर एक पुण्यातील NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.
          या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे शिवाय इतर नमुन्यांवर Genome sequencing सुरू आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
            INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago