पंढरपूरातून ११ वर्षीय मुलाचे अज्ञातांकडून अपहरण ?

      पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील राणी विष्णु चव्हाण वय- 25वर्षे,व्यवसाय- मजुरी ,रा- ज्ञानेश्वरनगर,पंढरपुर यांनी मुलगा रवि विष्णु चव्हाण वय-11 वर्षे यास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी पळवून नेल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
       या बाबत सदर महिलेने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी राणी चव्हाण या आई,पती व ११ वर्षीय मुलगा रवि यांच्यासोबत एकत्र राहण्यास असून मोलमजुरी करून उदरनिवार्ह करतात.फिर्यादीचे पती सर्कसमध्ये काम करतात.व सध्या ते तामिळनाडू येथे आहेत.२५ डिसेंबर रोजी मुलगा रवी हा गल्लीत मुलांसोबत खेळत होता.तो संध्याकाळी 9/30वा पर्यत घरी आला नाही म्हणुन फिर्यादीने त्याचा गल्लीमध्ये शोध घेतला व त्याचेसोबत रोज खेळण्याकरीता असलेल्या मुलांकडे विचारपुस केली.तेव्हा शेवटपर्यत तो एकटाच तेथे खेळत असल्याचे सांगितले.त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून येत नसल्याने सदर महिलेने आपल्या मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून अपहरण केले असल्याची फिर्याद दाखल केली आहे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago