ताज्याघडामोडी

स्वेरीचा ॲटलास कॉपको सोबत सामंजस्य करार

        पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा पुण्यातील ‘ॲटलास कॉपको’ सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         हा करार स्वेरीच्या विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांना एका नवीन क्षेत्रासंबंधातील कौशल्य वाढीस उपयुक्त ठरणार आहे. स्वेरीतील प्राध्यापकांचा संशोधनातील अनुभव विचारात घेवून या कंपनीने सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर ॲटलास कॉपको कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक कबीर गायकवाड व महाविद्यालयातर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ‘ॲटलास कॉपको’ बरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे स्वेरीमधील संशोधक व प्राध्यापक यांना इंडस्ट्रियल टूल आणि इक्यूपमेंट मॅन्युफॅक्चरिंग  तसेच  नवीन क्षेत्रामध्ये त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे.  ॲटलास कॉपको सोबत स्वेरीमधील प्राध्यापक व संशोधक यांची तांत्रिक बाबीं संदर्भात देवाण घेवाण होणार आहे तसेच या करारातून विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कौशल्य विकास आणि नोकरी विषयक विविध संधी प्राप्त होणार आहेत. यापूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३१ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. अशा करारामुळे स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच संशोधनाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे पाहून त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील ‘स्वेरी’ कडे शिक्षणासाठी वळत आहेत. भारत सरकारच्या भाभा अनुसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी रु. साडेसात कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेत. ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे व प्रा. अविनाश मोटे यांनी परिश्रम घेतले. या करारामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago