तर शेगाव दुमाला येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची कारवाई वाहन ताब्यात
चालकावर गुन्हा दाखल
गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध वाळू उपसा व वाहतूक यावर मोठ्या प्रमाणात कारवाया होत असतानाच अवैध वाळू उपसा व वाहतूक मात्र पूर्णपणे थांबलेली नसल्याचेच दिसून येत असतानाच दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्री इसबावी येथील एकता येथून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना बातमीदाराकडून मिळाली.या बाबत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असता पो.ना.संजय येलपले, पो.काँ.हुलजंती,चा.पो.काँ/घाटगे,पो.काँ.मोरे हे खाजगी मोटारसायकल वरून तेथे गेले असता राञौ/10/15वा चे सुमारास बातमीप्रमाणे एक वाहन येताना दिसले सदर वाहन चालकास हटकले असता तो गाडी जागेवरच थांबवुन तेथुन अंधाराचा फायदा घेऊन पऴुन गेला.सदर वाहन चेक केले असता एक पांढ-या रंगाचे अशोक लेलंड कंपनीचे चारचाकी वाहन नं MH28-BB/ 2806 वाहनाच्या हौदामध्ये अर्धा ब्रास वाऴु दिसुन आली ती वाऴु चोरीचीच असल्याची खाञी झाल्याने सदरचे वाहन पोलीस ठाणे येथे आणुन लावण्यात आले आहे.या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात पो.ना.संजय येलपले यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कायदा कलम 379 व खाण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1)21प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.
तर दिनांक २५ डिसेंबर रोजीच भरदुपारी साडेचार वाजता शेगाव दुमाला ता.पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.क./25 हणुमंत भराटे, पो.हे.क/1054 शिंदे, पो.ना/ 990 भोसले यांनी शेगाव दुमाला येथे जाऊन केलेल्या कारवाईत एक पांढरे रंगाचे टाटा कंपनीची पिकअप त्याचा आर.टी.ओ.नंबर खोडलेला तसेच त्याचा चेसी नंबर 374005LV0915417 तसेच सदर पिकअपचे पाठीमागील हौदामध्ये भिमा नदीपात्रातुन अवैध उपसा केलेली अर्धा ब्रास वाळु किंमत 2000/-रूपये असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून या प्रकरणी पिकअपचे चालक ऋषीकेश सौदागर आटकळे वय 20 वर्ष रा.शेगाव दुमाला ता.पंढरपूर याच्या विरोधात पो.क./25 हणुमंत गोरख भराटे नेम.पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी भा.दं.वि.379 सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.