”मी वडार महाराष्ट्राचा” संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड

      मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली असून माजी राज्यमंत्री तथा वडार समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या सुचनेनुसार मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांच्या हस्ते दत्तात्रय भोसले यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. 
       या निवडीनंतर बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी या निवडीबद्दल आभार मानत वडार समाजात हातावरले पोट असलेल्या कष्टकरी वर्गाची संख्या खूप मोठी असून या समाज बांधवाच्या उन्नतीसाठी आमचे नेते विजय चौगुले हे सातत्याने प्रयत्नशील आहेत.शासनदरबारी पाठपुरावा करीत आले आहेत.मी वडार महाराष्ट्राचा हि संघटना त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात वडार समाजाच्या उन्नतीचे काम करीत असून माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरविण्यासाठी परिश्रम घेणार आहे.
       यावेळी पंढरपूर नगर पालिकेचे विरोधीपक्ष नेते नगरसेवक सुधीर धोत्रे, समाजसेवक संजय बंदपट्टे,समाजसेवक महादेव धोत्रे,राजू धोत्रे,दत्ता विटकर,दिलीप धोत्रे,शंकर चौगुले,नागेश शिंदे आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago