ताज्याघडामोडी

राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे  पगार न झाल्याने  दिनांक 29 डिसेंबर 20 20 रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी बोंबाबोंब आंदोलन करणार

राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे  पगार न झाल्याने  दिनांक 29 डिसेंबर 20 20 रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी बोंबाबोंब आंदोलन करणार

महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावी या हेतूने शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे आवश्यक आहे परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने या महिन्यांमध्ये अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत सध्या कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या सात आठ महिन्यापासून काम करीत आहेत परंतु शासनाकडून गेल्या दोन  वर्षापासून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वीस तारखे नंतर दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार हा 23 24 तारखेला होतो परंतु चालू डिसेंबर महिन्यामध्ये आज 24 तारीख होऊन गेली तरी सुद्धा शासनाकडून अद्याप पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदाना दिली गेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद कर्मचारी वेतनापासून वंचित राहिला आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सहाय्यक वेतन अनुदान मिळावे म्हणून  शासनाचे  या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी  व  डिसेंबर महिन्याचे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 पर्यत न मिळाल्यास 29 डिसेंबर 20 20 पासून महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी आपल्या आपल्या नगर परिषदेसमोर अनुदानाची रक्कम नगरपरिषदाना  मिळेपर्यंत बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे अध्यक्ष  डॉ डी एल कराड  व  सरचिटणीस सुनील वाळुजकर व पुणे  विभागाचे अध्यक्ष  प्रा  ए बी पाटील यांनी दिली

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago