स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये प्रथम व थेट व्दितीय वर्ष डिप्लोमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू
पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनिअरिंगच्या प्रथम व थेट व्दितीय वर्ष डिप्लोमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरणे सुरू असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी दिली.
डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेश सन २०२०-२१ करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम व थेट व्दितीय वर्ष डिप्लोमा इंजिनीअरींग (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंगचे तेरावे वर्ष आहे. गेली सलग तीन वर्ष १००% ऍडमिशन पुर्ण होणारे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी अभियांत्रिकी (पदविका) महाविद्यालय आहे. उज्ज्वल यशाची पंरपंरा यंदा देखील महाविद्यालयाने कायम राखली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत स्वेरी पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी दिली.
दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा डी.टी.ई. च्या संकेतस्थाळावर २३/१२/२०२० रोजी प्रदर्शित केल्या जातील. या वर्षी ऍडमिशन प्रक्रिया फक्त दोनच फेऱ्या मध्ये पूर्ण होणार आहे. त्यापैकी पहिली फेरी पूर्ण झाली असून दुसऱ्या फेरीसाठीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणे व निश्चित करणे (दि. २४/१२/२०२० ते दि. २६/१२/२०२०),
व्दितीय फेरीची यादी प्रदर्शित होणे ( दि. २९/१२/२०२०),
व्दितीय फेरीत मिळालेल्या जागेची स्वीकृती करणे व
व्दितीय फेरीत मिळालेल्या जागेसाठी प्रत्यक्षात कॉलेज मध्ये उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे (दि. ३०/१२/२०२० ते दि. ०२/०१/२०२१, सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत). डिप्लोमा (पॉलिटेक्निक) प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी व ऑप्शन फॉर्म भरत असतानाच्या होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी मोबा.क्र ९८९०५६६२८१, ९४२१९६०२५८ व थेट व्दितीय वर्षासाठी मोबा.क्र ९९२१०३०६६९ यावर संपर्क साधण्याचे किंवा समक्ष स्वेरी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.)क्र.- ६४३७ मध्ये येऊन ऑप्शन फॉर्म भरण्याचे आवाहन डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी केले आहे. संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे व प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम व थेट व्दितीय वर्ष ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.