ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बीलाचे वाटप सुरु. चेअरमन,कल्याणराव काळे

            पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक  पंढरपूर येथे गटवार ऊस बीलाची वाटप सुरु आहे. अशी माहिती सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा सिताराम महाराज साखर कारखान्याचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांनी दिली.
            सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2020-21 मधील ऊस उत्पादक शेतकज्यांचा दि.17/11/2020 ते 30/11/2020 या पंधरवडा मध्ये गळीतास आलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रती मे.टन.रु.2000/- प्रमाणे सुरु असून गळीत हंगाम 2018-19 मधील शेतकज्यांची उर्वरीत एफआरपी रक्कम ही दि.24/12/2020 पासून पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेतून गटवाईज वाटप करण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बीले कमिशनसह प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था पंढरपूर येथे गट वाईज सुरु करण्यात आलेले आहेत. सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी चे सन 2018-19 मधील ऊस बीलाच्या एफआरपी पोटी प्रती मे.टन रु.500/- प्रमाणे सोमवार दि.21/12/2020 रोजी गटवाईज पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँक येथे वाटप सुरु करण्यात आले असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
               सहकार शिरोमणी व सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना आपल्या गटानूसार बीलाचे वाटप करण्यात येणार असून बँकेत कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर जास्त गर्दी होवू नये म्हणून कारखान्याच्या शेती विभागामार्फत संबंधीत शेतकज्यांना ऊस बीला संदर्भात निरोप दिल्यानंतरच बँकेत जावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

10 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago