वाखरी येथे दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह तयार कपडेही केले चोरटयांनी लंपास

          पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी येथे चोरटयांनी आपली करामत दाखविली असून शनिवारी रात्री वाखरी येथील किशोर धन्यकुमार जगदाळे यांच्या कापड दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी तयार कपडे व रोख रक्कम लंपास केली आहे.
          या प्रकरणी किशोर धन्यकुमार जगदाळे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दि.20/12/2020रोजी चे सकाळी 08/00वा.चे सुमारास फिर्यादी हे वैरण काढण्यासाठी दुकानाचे समोरून चाललो असताना दुकानाचे शटर खालुन उचकटुन कुलुप तोडलेले दिसले असता त्यांना आपल्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याचे आढळून आले.
थंडीचा कडाका वाढत असतानाच प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी चोरटे सक्रिय झाले असल्याचे दिसून येत असून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार रोख रकमेसह दागिने चोरीच्या घटना वाढत असून याच बरोबर चारचाकी व दुचाकी वाहनेही चोरीस जात असल्याचे दिसून येत आहे.अशा घटना रोखण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या गस्तीची वारंवारिता आणखी वाढविण्याची गरज असून सतत चोरीच्या घटना घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago