श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड
पंढरपूर, दि. २१ : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी श्री भगिरथ
भारत भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दिनांक २१.१२.२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता
कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये अध्यासी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री एस.एम.तांदळे
यांचे अध्यक्षतेखाली संचालकांची समा आयोजित करणेत आली होती. सदर सभेमध्ये चेअरमन पदासाठी एकच
अर्ज आल्याने प्राधिकृत अधिकारी, श्री तांदळे यांनी चेअरमनपदी श्री भगिरथ भारत भालके यांची बिनविरोध निवड
झाल्याचे जाहीर केले. सदर प्रसंगी सह.शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष श्री कल्याणराव काळे व उपस्थित सर्व
कार्यकर्त्यांनी नुतन चेअरमन श्री भगिरथ भालके यांचे अभिनंदन केले.
चेअरमन निवडी नंतर बोलताना नुतन चेअरमन श्री भगिरथ भालके म्हणाले की, श्री विठ्ठलच्या
संचालकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासास पात्र राहून कारखान्याचा कारभार सर्वांना बरोबर
घेऊन केला जाईल. सध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. सभासद शेतकऱ्यांच्या नोंदलेल्या सर्व
ऊसाचे गाळप केले जाईल. सभासदांनी आपला सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार, संचालक श्री मोहन कोळेकर, श्री
युवराज पाटील, श्री विजयसिंह देशमुख, अँड.दिनकर पाटील, श्री गोकुळ जाधव, श्री दशरथ खळगे, श्री सुर्यकांत
बागल, श्री समाधान काळे, श्री विलास देठे, श्री नेताजी सावंत, श्री संतोष गायकवाड, श्री नारायण जाधव,
श्री बाळासाहेब गडदे, सौ.मंदाकिनी राजाराम भिंगारे, सौ.कल्पना महादेव देठे, श्री धनाजी घाडगे, श्री शांतीनाथ
बागल तसेच माजी संचालक ज्ञानेश्वर गायकवाड, राजाराम भिंगारे,महादेव देठे, विलास भोसले, कांतीलाल
भिंगारे, द्रोणाचार्य हाके, धोंडीराम वाघमारे, तानाजीभाऊ चव्हाण, भिमराव पवार,शहाजी साळुंखे, व्यंकटराव
भालके,शेखर भालके,कोष्टी वकील, शालीवाहन कोळेकर, शशिकांत बागल, राजेंद्र भोसले,सुभाष हुंगे-पाटील,दिपक
सदाबसे,किरण घाडगे,सुधाकर धुमाळ,सागर यादव,शुभम घाडगे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते.
प्राचार्य डी.आर.पवारसर, आर.डी.पवार तसेच कार्यकारी संचालक आर.एस.बोरावके,अधिकारी वर्ग,कर्मचारी,
सभासद, हितचितक मोठया संख्येने उपस्थितीत होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…