सिताराम च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनिधि) दि२१- खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या 8 व्या बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा. शिवाजी काळुंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभाताई काळुंगे, चेअरमन धनश्री पतसंस्था व मल्टीस्टेट बँक, मंगळवेढा यांचे हस्ते गव्हाण पुजन तसेच सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते गव्हाणीत ऊ साची मोळी टाकून करण्यात आला.
प्रारंभी कारखान्याचे कर्मचारी श्री. सुनिल रोंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच कामगार श्री. प्रशांत राजाराम बुरांडे, देविदास वाघमारे, श्री. रामेश्वर पवार व श्री. बाळासाहेब जाधव यांचे शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा व कारखान्याचे काटा पुजनाचा कार्यक‘म कर्मचारी श्री. आण्णासाहेब नवनाथ थिटे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सिमा आण्णासाहेब थिटे या उभयतांचे शुभहस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. समाधान काळे म्हणाले की, मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना बंद ठेवावा लागला त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले.परंतु धनश्री परिवाराने सिताराम कारखान्यास आर्थिक मदत करुन कारखाना चालु करणेकामी चालना दिल्याचे नमुद केले. कारखान्याचे संचालक श्री. महादेव देठे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आर्थिक निधीची उपलब्धता झालेनंतर कामगारांनी फक्त 40 दिवसात कारखान्याचे पुर्ण ओव्हरहॉलींग व मेटनन्सची कांमे पुर्ण केली आहेत. यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक श्री. सुधाकर कवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विठठल परिवार हा संघर्षातुन तयार झालेला परिवार असुन या परिवारास संघर्षातुन आपले ध्येय गाठणेकांमी वाटचाल करणेचे संपुर्ण ज्ञान असलेचे यावेळी नमुद केले.
यावेळी शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, सिताराम महाराज साखर कारखान्याने पुढील 4 महिन्याच्या हंगामात जास्तीतजास्त ऊसाचे गाळप करुन व सहवीज निर्मिती प्रकल्पातुन जास्तीतजास्त विज एक्सपोर्ट करुन आर्थिक घडी बसविणे आवश्यक आहे. धनश्री पतसंस्थेचे चेअरमन सौ. शोभाताई काळुंगे म्हणाल्या की, कामगारांनी सकारात्मक वृती ठेवुन चांगले परिणाम देणे गरजेचे आहे. कर्मचा-यांची आपल्या कामावर व संस्थेवर निष्ठा असणे गरजेचे आहे असे विचार व्यक्त केल्या.
अध्यक्षपद्ावरुन बोलताना सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न तयार झाले व त्यातुन संयमाने आर्थिक अडचणी सोडवुन शेतक-यांच्या 2018-19 मधील ऊस बिलाच्या एफआरपी पोटी प्र.मे.टन रु. 500/- प्रमाणे रक्कम गटवाईज बँकेत जमा केली असुन कारखान्याचे चिटबॉय मार्फत संबंधीत शेतक-यांस कळविणेत आलेले असुन ती रक्कम घेवुन जावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीमुळे बँकांच्या व्याजाचा डोलारा व हप्ते याकरीता बँक कर्जासाठी वेळोवेळी माजी कृषीमंत्री पवारसाहेब यांची भेट घेतली व पवारसाहेबानी सहकार शिरोमणी व विठठल कारखान्यास सहकार्य केल्याचे आर्वूजन सांगितले.
सदर कार्यक‘मास यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन नारायणदादा मोरे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधानदादा काळे, विठठल सह.साखर कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, महादेव देठे, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे, माजी संचालक तुकाराम माने, तानाजी जाधव, भारत भुसे, राजसिंह माने, गंगथडे भाऊ,बिभीषण ताड, सोपान तोडकर, पंढरपूर शहर काँग‘ेस कमिटीचे अध्यक्ष राजेश भादुले आदी उपस्थित होते. जनरल मॅनेजर डी.के.शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी वर्क्स मॅनेजर भिंगारे, टेक्नीकल मॅनेजर शिंदे, शेती अधिकारी आसबे, चिफ अकौटंट शिंदे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी डी.एम्. सुतार यांनी आभार व्यक्त केले.