ताज्याघडामोडी

सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप…

सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप…
पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. व सौ. सविता रवि सोनार यांची सुवर्णकन्या कु. रेवती सोनार हिच्या जन्मदिवसाच्या औचित्याने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला सोनार कुटुंबियांनी फाटा दिला आहे. परंतु वाचलेल्या रकमेतून त्यांची आस्थापना असलेल्या दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक व सहकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना लोकरीचे उबदार स्वेटर स्नेहभेट म्हणून दिले आहेत. सामाजिक भान ठेवून वेगवेगळे सांस्कृतिक सण उत्सव, जन्मदिवस, रेशीमबंध दिवस अशा वैशिष्ट्यपूर्ण औचित्याने सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत असतात.
        सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त कष्टकरी व होतकरू व्यक्तींना कडाक्याच्या थंडीत ऐन हिवाळ्याच्या दिवसात स्नेहभेट स्वरुपात स्वेटर भेट दिल्याने कष्टकरी व होतकरू व्यक्तींना उब मिळणार आहे. सोनार परिवाराच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे पंढरपूर आणि परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. आणि सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या परिवाराप्रमाणेच जास्तीत जास्त परिवारांनी सण-उत्सव आणि जन्मदिवसाच्या औचित्याने असे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविल्यास एकूणच समाजासाठी लाभ होईल असे मतही काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago