ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख
पंढरपूर (प्रतिनिधी):- ग्रामपंचायत निवडणुकीचे ‘पडघम’ वाजण्यास सुरुवात झाली असुन पंढरपूर तालुक्यातील ज्या-ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली. ग्रामीण भागातील तळागालातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणुक लढवणार असल्याचेही ते म्हणाले.
ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे त्या सर्व ग्रामपंचायतीची निवडणुक पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना लढणार असुन पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आवश्यक तेथे महाआघाडीतुन व शक्य तेथे स्वबळावर लढण्याचा निर्णय आजच्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांची बैठक सावित्रीबाई फुले कला महाविद्यालय पंढरपूर येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शैलाताई गोडसे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमख रविंद्र मुळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे विनायक वनारे, तानाजी मोरे, पोपट सावतराव, अविनाश वाळके, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. आरती बसवंती, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. पुर्वा पांढरे, महिला आघाडी शहर सन्मवयक सौ. संगीता पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख पवनराजे शिंदे, अर्जुन भोसले, संतोष धोत्रे, कल्याण कवडे, शिवसेना विभाग प्रमुख विलास चव्हान, उमेश काळे, विशाल गायकवाड, उत्तम कराळे, बाळासाहेब पवार, शिवसैनिक विजय करपे, युवराज गनगे, बाळासाहेब गनगे, युवासेना उपतालुका प्रमुख रणजीत कदम, दत्ता पेठकर, गणेश कदम, नागेश जाधव, माऊली मासाळ, गणेश जाधव, शुभम चव्हाण तसेच सर्व विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पंढरपुर तालुक्यातील इतर बहुसंख्य शिवसैनिक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…