ताज्याघडामोडी

कोरोना लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमासंबंधी उपजिल्हा रुग्णालय येथे आ.प्रशांत परिचारक यांनी घेतली आढावा बैठक

          आज सोलापूर जिल्हयाचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी भारत सरकारच्या आगामी काळात होणाऱ्या कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे सोबत बैठक घेतली.

         यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढोबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, पंचायत समिती उपसभापती प्रशांतभैय्या देशमुख, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, न पा मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटशिक्षणाधिकारी घोडके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, नागेशकाका भोसले यांचेसह शासनाच्या वतीने आगामी काळात सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा विस्तृत आढावा घेवून ग्रामीण व शहरात हि लसीकरण मोहिम प्रभावीपणे व नियोजित वेळेत कशा प्रकारे यशस्वी करता येईल यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या प्रतिनिधींच्या सक्रिय सहभाग कोरोना प्रतिबंधासाठी कसा करता येईल व सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी करण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांशी विचारविनिमय केला.

         तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, याबाबतचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. पहिल्या टप्यात प्रांताधिकारी कार्यालयात असणाऱ्या कोविड वॉररूममधील पोर्टलला नोंदी झालेल्या उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालये, आरोग्य केंद्रे, नगरपालिका दवाखाना या कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी हॉस्पिटल, मेडिकल शॉप व पॅथॉलॉजी लॅबर यामधील नोंदणी केलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. याची नोंदणी सुरू असून पंढरपूर शहर व तालुक्यातून आत्तापर्यंत 2500 हून अधिक जणांनी नाव नोंदणी केलेली आहे. दुसऱ्या टप्पात कोरोना काळात सेवा बजाविणारे पोलीस, ग्रामसेवक, शिक्षक आदीं व तिसऱ्या टप्यात 50 वर्षावरील सर्व व 50 वर्षाच्या आतील मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार अशांना लसीकरणाचा लाभ होणार आहे. सदर लसीकरणाची मोहिम पंढरपूर शहर व ग्रामीणमध्ये 30 ठिकाणी राबवली जाणार आहे.

           यावेळी आ.प्रशांत परिचारक यांनी, यासाठी शहरामध्ये लसीकरण केंद् उभारण्यासाठी आवश्यक असणारी जागा नगरपालिका मार्फत उपलब्ध करुन देणे, तसेच या जागा देत असताना कोविड19 लसीचासाठा करण्यासाठी आवश्यक त्या तापमानातील शीतगृह उपलब्ध करणे आदींचा विचार करुन नियोजन करण्याच्या सुचना केल्या.

           आज अखेर उपजिल्हा रूग्णालय, पंढरपूर येथे शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 7,677 असून 7257 बाधित रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. उर्वरीत पंढरपूर शहरातील 40 व ग्रामीण भागातील 152 असे 192 रूग्ण पंढरपूरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत कोरोना बाधित रूग्णापैंकी 228 रूग्ण मयत झालेले आहेत.

          सदर बैठकीस पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक विक्रम शिरसट, तम्मा घोडके, डि राज सर्वगोड, नवनाथ रानगट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago